देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नवा पेनड्राईव्ह बॉम्ब सादर केला. यात ऑडिओ असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली आहे. वक्फ बोर्डावर दाऊदच्या माणसांना नियुक्त केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे. वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुद्दस्सिर लांबे यांचे दाऊदशी संबंध असून त्यांचे संभाषण या पेनड्राईव्हमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
या पेनड्राईव्ह बॉम्बमध्ये दोन पात्र आहेत मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुद्दस्सिर लांबे हे वक्फ बोर्डचे सदस्य आहेत. डॉ. मुद्दस्सिर लांबे यांच्या विरोधात ३१ डिसेंबर २०२० ला एका ३३ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्यांनी बलात्काराची तक्रार दाखल केली. जेव्हा तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबे यांनी लग्न करण्याची तयारी दर्शवली त्यानंतर मात्र गंभीर परिणाम होतील असे सांगितले गेले. महिलेच्या पतीने तिला घटस्फोट दिला असे संबंधित महिलेने सांगितले. असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.
( हेही वाचा : दीड लाखांहून अधिक काश्मिरी पंडितांची हत्या, तरी काँग्रेसला मुसलमानांचा पुळका! )
पेनड्राईव्हमधील संवाद
डॉ. लांबे- माझी समस्या काय आहे माहित आहे का? माझे सासरे दाऊदचे राईट हॅंड होते. माझे लग्न हसीना आपाने जमवले होते. माझ्या बाजूने सोहेल भाई होते. हसीना आपा म्हणजे दाऊदची बहिण आणि सोबत इक्बाल कासकरची पत्नी म्हणजेच दाऊदची वहिनी, जरा काही झाले तर बातमी थेट कराचीला जाते.
अर्शद खान- तुम्ही अन्वरचे नाव ऐकले असेल ते माझे काका आहेत. ते पण त्यांच्यासोबत राहायचे. आता त्यांचे निधन झाले.
डॉ. लांबे- माझे सासरे ब्लॅक बेल्ट होते आणि संपूर्ण कोकण पट्टा सांभाळत होते.
अर्शद खान- मी मदनपुरात होतो तेव्हा माझे एक काका मुंबईला होते. माझा जन्म भेंडी बाजारात झाला.
डॉ. लांबे- माझ्या घरी काही झाले तरी बातमी तिथवर ( सोहेल भाईपर्यंत) पोहोचते. चार दिवसांपासून माझ्या घरात हा वाद सुरू आहे.
अर्शद खान- म्हणून मी विचारले तुझी कहाणी काय आहे. मला स्वत:चं टेन्शन आहे. असे ती म्हणाली
डॉ. लांबे- अर्शद, मी सांगतो तू वक्पचे काम घे तुला हवे तेवढे पैसे मिळतील कमाई सेट करा. अर्धा हिस्सा तुझा आणि अर्धा हिस्सा माझा
अर्शद खान- आता मी बसेन आणि या सर्व गोष्टींवर तुमच्याशी वैयक्तिक चर्चा करेन. माझा एक माणूस घेऊन येईन
डॉ. लांबे- मला काही झाले तर आमच्या माहिमध्ये सगळे लोक एकत्र यायचे.
अर्शद खान – अर्शदच्या नावावर इमारत घ्या. अर्शद माझा विश्वासू माणूस आहे. पलटी मारणार नाही.
डॉ. लांबे- तुमच्यावर चौकशी बसू शकते, पण माझ्यावर बसू शकत नाही.
फडणवीसांचा सवाल
हे संभाषण विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात वाचून दाखवले तसेच दाऊदशी संबंध असलेले वक्फ बोर्डाचे सदस्य आहेत असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. हे संभाषण डिलीट करण्याआधी मोबाईल ताब्यात घ्या, असं सांगतानाच चक्क दाऊदची माणसं तुम्ही वक्फ बोर्डावर नियुक्त केली. अर्थसंकल्पात काही गोष्टी कमी जास्त होतील. पण बॉम्ब स्फोटात असलेल्यांना वक्फ बोर्डावर घेणं कितपत योग्य आहे, असा सवाल फडणवीसांनी केला.
( ही बातमी व्हायरल कंटेटच्या आधारे प्रकाशित केली गेली आहे. हिंदुस्थान पोस्ट याची पुष्टी करत नाही, हा तपासाचा भाग आहे. विधीमंडळात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवरून ही बातमी प्रकाशित केली आहे. )
Join Our WhatsApp Community