‘या’ कारणामुळे वाढतेय कलिंगडाची मागणी! जाणून घ्या दर…

177

उन्हाळा सुरू झाला की शरीराला पोषक, गारवा देणारी कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होतात. फ्रूट सॅलड, ज्यूस बनवण्यासाठी कलिंगडचा वापर होतो. उन्हाचा कडाका वाढल्याने कलिंगडची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गडद हिरव्या रंगाचे कलिंगड ‘शुगर किंग’ तर, हिरवे पट्टे असणारे कलिंगड ‘नामधारी’ या नावाने ओळखले जाते.

( हेही वाचा : मुंबईत ‘या’ चार ठिकाणी तापमानाने गाठली चाळीशी )

कलिंगडाला वाढती मागणी

गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कलिंगडाची आवक वाढली आहे. सध्या दररोज १०० ते १२० टन कलिंगड बाजारात येत आहेत. घाऊक बाजारात एका किलोला दर्जानुसार ८ ते १२ रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात दर्जानुसार एक कलिंगड १२० ते १५० रुपयांपर्यंत मिळत आहे. मागणी वाढत असल्याने कलिंगडाचे भाव तुलनेने २० ते ३० टक्के जास्त आहेत.

ग्राहकांची संख्याही वाढणार

बाजारात श्रीगोंदा, दौंड, सोलापूर, सातारा, कराड, शिरूर, कर्जत, राशन, कर्नाटक येथून कलिंगडाची आवक होत आहे. पुढील काही दिवसांत बाजारात कलिंगडाची आवक वाढणार आहे. तसेच, उन्हाळा वाढेल तसे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढणार आहे. संपूर्ण उन्हाळा कलिंगडाचा हंगाम चालणार असल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.