‘भगवंता’ काय केलंस? शपथविधीसाठी ‘आम आदमीचं’च शेत तुडवलंस?

गव्हाचे शेत साफ करण्याच्या या कामाला सुरुवात झाली असल्याचे देखील सूत्रांकडून कळत आहे.

122

पंजाबात आम आदमी पार्टीने आपली ताकद दाखवत सत्तेचे तख्त मिळवले. यासाठी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांचे कौतुक करण्यात येत आहे. पण याचबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

16 मार्च रोजी आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे भावी मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी पंजाबच्या खटकर कलान परिसरात जय्यत तयारी करण्यात येत आहे. पण TOI ने दिलेल्या एका वृत्तानुसार, या शपथविधीच्या ठिकाणी गाड्यांच्या पार्किंगसाठी 40 एकर जागेत असलेलं गव्हाचं शेत तुडवण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. गव्हाचे शेत साफ करण्याच्या या कामाला सुरुवात झाली असल्याचे देखील सूत्रांकडून कळत आहे.

(हेही वाचाः कोविड काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सरकारी पक्षांना अभय!)

अधिका-यांचेही दुर्लक्ष

इतकंच नाही तर ही जागा कमी पडल्यास आजूबाजूची इतरही जागा पार्किंगसाठी वापरण्यात येणार असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे. आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांचे प्रधान सचिव म्हणून प्रशासकीय अधिकारी ए वेणू प्रसाद यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली आहे. शपथविधीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रसाद यांनी घटनास्थळी भेट देली. त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे.

किती दिला मोबदला?

ही 40 एकर शेतजमीन ज्याची आहे त्या शेतक-याला प्रति एकर केवळ 46 हजार रुपये भरपाई म्हणून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तब्बल 40 एकर जमिनीसाठी दिलेला हा मोबदला खूपच कमी असल्याचेही काही लोकांचे म्हणणे आहे.

(हेही वाचाः ऑफिस टायमिंग नंतर बॉसच्या कटकटीपासून होणार सुटका? सुप्रिया सुळेंनी मांडले अनोखे ‘विधेयक’)

‘आप’ने लुटली सरकारी तिजोरी 

पंजाबमध्ये सत्ता गमावलेल्या काँग्रेस पक्षाने आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करायला सुरुवात केली आहे. शपथविधी सोहळ्यापूर्वीच भगवंत मान यांनी राज्य सरकारची तिजोरी रिकामी करायला सुरुवात केली असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. रविवारी आम आदमी पार्टीने केलेल्या रोड शो साठी पंजाब सरकारच्या तिजोरीतून तब्बल 2 कोटी 61 लाख रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचाः नव्या पाच विधानसभांमध्ये किती आहेत शिक्षित आमदार? 2017च्या तुलनेत अशी आहे आकडेवारी)

केजरीवाल यांनी पैसे परत करावेत

पंजाब कर्जात बुडालेला असताना सार्वजनिक तिजोरीचा दुरुपयोग आपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे, असे माजी विरोधी पक्षनेते आणि भोलाथमधील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी ट्वीट करत म्हटले आहे. राजकीयदृष्ट्या प्रेरित पक्षाच्या प्रचारासाठी सार्वजनिक तिजोरीचा हा घोर दुरुपयोग आहे. पंजाब सरकारवर ३ लाख कोटींहून अधिक कर्जाचा बोजा असताना, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांनी हे पैसे सरकारच्या तिजोरीत जमा करावेत असेही त्यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.