गेल्या काही दिवसांपासून अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जवळपास सर्वच घरगुती वापराच्या वस्तूंची दरवाढ झाली आहे. आता भरीत भर म्हणून कमीत कमी वेळेत भूक भागवणा-या मॅगीचे दर देखील आता वाढले आहेत. त्यामुळे आता स्वस्तात मस्त मॅगी देखील आता सामांन्यांच्या खिशाला कात्री लावणार आहे.
असे आहेत नवीन दर
मॅगी उत्पादक कंपनी नेस्ले इंडियाकडून मॅगीच्या किंमतीत 9 ते 16 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 12 रुपयांचे मॅगीचे पाकीट आता 14 रुपयांना, तर 96 रुपयांचं पाकीट तब्बल 105 रुपयांना बाजारात मिळणार आहे. मॅगीचा 140 ग्रॅमचा पॅकमध्ये तीन रुपयांची वाढ झाली आहे.
(हेही वाचाः ४० व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, तरीही ‘तो’ वाचला)
का वाढले दर?
मॅगीच्या किंमतीत वाढ होण्यामागची कारणे देखील कंपनीकडून देण्यात आली आहेत. मॅगीचे उत्पादन करण्यासाठी लागणारा उत्पादन खर्च वाढल्यामुळे मॅगीच्या किंमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गहू महागला आहे, त्याचा परिणाम देखील या किंमती वाढण्याचं कारण असू शकतात, असे काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
महागाईचा उच्चांक
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात महागाई वाढली आहे. ठोक महागाई दर वाढून 13.11 टक्के झाला आहे. तर, जानेवारी महिन्यात हादर 12.96 टक्के होता. रशिया-युक्रेनमधील युद्ध शांत होत नाही तोवर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत घट होणे अवघड असल्याचे देखील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
(हेही वाचाः मुंबईत केवळ २७ कोविडचे रुग्ण : कोविडच्या लसीची मात्रा लागू)
Join Our WhatsApp Community