भाजप अडचणीत! ‘या’ प्रकरणी प्रविण दरेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

146

मुंबई बँक घोटाळा प्रकरणी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासमोरील अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. दरेकर बोगस मजूर असल्याचे दाखवत मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

काय झाला दरेकरांवर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असल्याचे व मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचा अध्यक्ष होते. २०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर आणि काही लोकांनी जवळपास २००० कोटींचा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले असल्याचे समोर येत आहे.

दोन महिन्यांपूर्वी दरेकरांविरोधात आपची तक्रार

दोन महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाने मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सहकार विभागाची मजूर असल्याचे भासवून वर्षानुवर्षे फसवणूक करणारे आमदार व विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करत नव्हते. सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. यासंदर्भात आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर आज दोन महिन्यांनी मुंबई बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला असल्याचे आपकडून सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.