मोबाईल फोन ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची व गरजेची वस्तू झालेली आहे. आपला मोबाईल फोन आपल्या जवळ नसला की, प्रत्येक माणूस बैचेन होतो. परंतु अनेकदा घाईगडबडीत आपला फोन गहाळ होतो किंवा हरवतो अशावेळी मात्र शोधाशोध करत हतबल होऊन अनेकजण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतात. आता मात्र बेस्ट उपक्रमाने ज्यांचे फेब्रुवारी महिन्यात फोन गहाळ झाले आहेत अशा सर्व नागरिकांना दिलासा दिला आहे.
( हेही वाचा : पालकांमधील असंतोषावर शिक्षणमंत्र्यांनी दिले ‘हे’ उत्तर! )
ट्वीटरवर यादी जाहीर
बेस्ट उपक्रमाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून गहाळ किंवा बसमध्ये हरवलेल्या मोबाईल फोनची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये मोबाईल फोन हरवलेला दिनांक, बसक्रमांकाचा मार्ग, मोबाईल फोनचे नाव नमूद केलेले आहे. त्यामुळे ज्यांचे फोन हरवले आहेत त्यांनी तातडीने बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधावा आणि हे मोबाईल फोन १३ एप्रिल २०२२ च्या आधी आपल्या स्वाधीन करून घ्यावेत असे आवाहन उपक्रमामार्फत करण्यात आले आहे.
या संकेतस्थळावर उपलब्ध
तसेच गहाळ वस्तूंची अधिक माहिती बेस्ट उपक्रमाच्या bestundertaking.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही बेस्टने स्पष्ट केले आहे.
बेस्टमध्ये फेब्रुवारी महिन्यात गहाळ झालेल्या मोबाईल फोनची यादी पुढीलप्रमाणे आहे.
Join Our WhatsApp CommunityLOST your MOBILE Phone in BEST bus : List of Mobile sets deposited at our Lost Property section in the month of FEBRUARY 2022 is notified with contact details on our website https://t.co/ciXmfjiH4w for information. #bestupdates
Click link for details :https://t.co/vVT4QJsBl2 pic.twitter.com/QIruZYJzBK— BEST Bus Transport (@myBESTBus) March 14, 2022