राज्यातील बळीराजासाठी एक आनंदाची बातमी आहे. मंगळवारी विधानसभेत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली. यावेळी ते म्हणाले. वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचावीज पुरवठा पूर्ववत होणार असून शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत वीज तोडणी केली जाणार नाही. तर साधारण तीन महिने ही वीज तोडणी तात्पुरती थांबवली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या मुद्यावरुन सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला त्यानंतर राज्य सरकार नरमल्याचे दिसून आले.
काय म्हणाले ऊर्जा मंत्री?
पुढील तीन महिने शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. त्याशिवाय वीज तोडणी केलेल्या शेतकऱ्यांची वीजसुद्धा पुर्ववत केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सभागृहात सांगितले. शेतकऱ्यांच्या वीज तोडणी हा सभागृहातील मोठा चर्चेचा विषय होता. त्यानंतर उर्जामंत्र्यांनी पिक हातात येईपर्यंत म्हणजेच पढील तीन महिने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नसून, वीज तोडणी केलेल्या शेतकऱ्यांचा देखील वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत केला जाणार घोषणा केली आहे. राऊत यांच्या या घोषणेनंतर शतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या आनंदाचे वातावरण आहे.
(हेही वाचा – ‘द काश्मीर फाईल्स’वर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?)
फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा
ज्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी केली होती, त्या शेतकऱ्यांची वीज आज दिवसभरात जोडली जाणार असल्याचे राऊत यांनी सभागृहात सांगितले. शेतकऱ्यांना प्राथमिकता देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तर थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पिक येईपर्यंत पुढचे तीन महिने वीज तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवत आहोत असे राऊत म्हणाले. दरम्यान, या मुद्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.