वर्ल्ड चॅम्पियनशिपचा किताब पटकावणाऱ्या WWE च्या सुपरस्टारचे निधन

141

डब्ल्यूडब्ल्यूई चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. डब्लूडब्लूई वर्ल्ड चॅम्पियनशिपचा किताब पटकावणारे स्कॉट हॉल यांचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. स्कॉट हॉल यांना तीन हृदयविकाराचे झटके आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मृत्यूशी झूंज त्यांची अपयशी ठरली. याबाबतची माहिती स्कॉट हॉल यांचे मित्र आणि सहकारी हॉल ऑफ फेमर केविन नॅश यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ते पडले होते ज्यामुळे त्यांच्या नितंबात खोल दुखापत झाली होती. यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली होती. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडली.

स्कॉट हॉल यांच्याबद्दल…

स्कॉट हॉल यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1958 रोजी अमेरिकेत झाला असून त्यांनी 1984 मध्ये आपल्या कुस्ती कारकिर्दीला सुरुवात केली. 1991 मध्ये स्कॉट यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये सहभाग नोंदवला. 1992 मध्ये स्कॉट यांना डब्लूडब्लूईने साईन केले. 1996 मध्ये, स्कॉट हॉल पुन्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये सामील झाले आणि निवृत्तीपर्यंत तिथेच राहिले. निवृत्त झाल्यानंतर स्कॉट हॉल यांचा डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. अनेक डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार्सनी स्कॉट हॉल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – ऋतुजा-अंकिताने दुहेरीचे पटकावले विजेतेपद!)

अनेक मोठ्या स्टार्सशी स्कॉट हॉल यांची स्पर्धा

डब्लूडब्लूईमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारमध्ये स्कॉट यांचाही समावेश होता. स्कॉट यांनी डब्लूडब्लूई वर्ल्ड चॅम्पियनशिपचे दोन खिताब जिंकले होते. याशिवाय त्यांनी डब्लूडब्लूईमध्ये चार वेळा इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनचे विजेतेपद पटकावले होते. शिवाय नवीन पिढीसाठी एक प्रेरणा म्हणून काम केले. त्यांनी 1995 समरस्लॅम आणि रेसलमेनिया येथे स्कॉट हॉलच्या केविन नॅश, ब्रेट हार्ट, शॉन मायकेल्ससह अनेक मोठ्या स्टार्सशी स्पर्धा केली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.