आरबीआयने ठोठावला 8 सहकारी बँकांना दंड! महाराष्ट्रातील कोणत्या आहेत बँका?

142

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 8 सहकारी बँकांना 12.75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सहकारी बँकांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील बँकांचा समावेश आहे.

कोणत्या आहेत बँका?

आरबीआयने मणिपूर महिला सहकारी बँक लिमिटेड (मणिपूर), युनायटेड इंडिया सहकारी बँक लिमिटेड (यूपी), जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक (नरसिंगपूर), अमरावती मर्चंट सहकारी बँक लिमिटेड (अमरावती), फैज मर्कंटाइल सहकारी बँक लिमिटेड (नाशिक) आणि नवनिर्माण सहकारी बँक लि. (अहमदाबाद) या बँकांना दंड ठोठावला आहे.

(हेही वाचा तर 2040 मध्ये भारताचा पंतप्रधान मुसलमान असेल! रणजित सावरकरांनी दिला धोक्याचा इशारा)

आरबीआयने ताशेरे ओढले

या सहकारी बँकांवर विविध प्रकारच्या आर्थिक अनियमितता दिसल्याने आरबीआयने ताशेरे ओढले आहेत. डिपॉझिटर एज्युकेशन अॅण्ड अवेअरनेस फंडमध्ये दावा न केलेल्या ठेवी जमा न करणे, बँक घोटाळ्यांचा उशिरा अहवाल देणे आणि असुरक्षित कर्जे वितरित करणे या कारणांमुळे काही बँकांना दंड ठोठावण्यात आला. यापूर्वी आरबीआयने लखनऊ येथील इंडियन मर्केंटाइल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर एक लाख रुपये काढण्याच्या मर्यादेसह अनेक निर्बंध लादले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.