शहरातील बाजारपेठांमध्ये रंगोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. विविध प्रकारचे रंग, मुखवटे, पिचकाऱ्यांनी दुकाने सजली आहेत. यामध्ये ‘छोटा भीम’, ‘स्पायडरमॅन’ या लहानग्यांचा आवडत्या हिरोंसह मोठ्या बंदुकीच्या आकारातील पिचकाऱ्यादेखील मुलांसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे यंदा बाजारपेठेत ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधमुक्त होळी साजरी होणार आहे.
यंदा बाजारात गर्दी
बाजारात खरेदीसाठी लगबग सुरु झाल्याने व्यवसायिकांमध्येही उत्साह दिसून येत आहे. होळीनंतर धुळवड आणि मग फाल्गुन पंचमी दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. यंदा रंगपंचमी १८ मार्च रोजी आहे. सध्या शहरातील बाजारपेठेत केमिकलयुक्त व पर्यावरण पूरक असे दोन प्रकारचे रंग आहेत. केमिकलयुक्त रंग हे त्वचेसाठी घातक असल्याने गेल्या काही वर्षांपासून नागरिकांकडून पर्यावरणपूरक रंग वापरण्यात येत आहे. गेल्या वर्षात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र होता. त्यामुळे सर्व सण उत्सव नागरिकांनी साध्या पद्धतीने साजरा केला. त्यामुळे त्याचा व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला. यंदा होळीनिमित्त बाजारात नवीन साहित्य विक्रीला आले आहेत. गतवर्षी कोरोनामुळे नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्याने व्यवसाय मंद झाला होता. मात्र, यंदा बाजारात गर्दी दिसून येत आहे.
विविध प्रकारचे नवे मुखवटे, विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, फॅन्सी विक, जठाधारी विक, कलर स्नोक स्प्रे, फॅन्सी टोपी, रॅट गन, शॉवर, मॅजिक स्प्रे कलर, वॉटर टॅंक, आदींचा समावेश असून लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत, वयोवृध्दसाठीही बाजारात होळी उत्सव साजरा करण्याकरता साहित्य आले आहे.
Join Our WhatsApp Community