दारुड्यांची करायला गेले तक्रार तर पोलिसच दिसले अशा अवस्थेत, वाचून व्हाल अवाक!

152

नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत रात्री काही नागरिक दारु पिऊन धिंगाणा घालणा-यांची तक्रार करण्यासाठी पोलिसांत गेले. पण, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांनी पाहिलं की, पोलीसच दारु पिऊन टाईट आहेत. पोलीस स्टेशनमधील हा धक्कादायक प्रकार पाहून नागरिकांनी आपल्या तक्रारी करायच्या तरी कुठे असा प्रश्न उपस्थित केला.

तर पोलिसच करत होते दारु पार्टी

परिसरातील काही बेवडे दारु पिऊन धिंगाणा घालतात म्हणून त्यांची तक्रार करण्यासाठी काही नागरिक डिके नगर पोलीस चौकीत तक्रार करण्साठी गेले असता, त्यांना एक धक्कादायक प्रकार दिसला. दारुड्यांची क तक्रार करायला गेले असता, पोलीसच दारु पिऊन टाईट होते.

( हेही वाचा :आठवड्याभरात पोलीस ठाण्यांतील सीसीटीव्ही सुरु करा अन्यथा… उच्च न्यायालय ! )

वरिष्ठ काय कारवाई करणार

या नागरिकांमधील शिंदे नामक व्यक्ती यांनी पोलिसांचा हा दारु पिण्याचा प्रकार लगेच मोबाईल काढत, कैद करण्याचा प्रयत्न केला. या पोलिसांच्या कृत्याचे चित्रीकरण करताना, शिंदे यांना एका पोलिसाने मारहाण केली. संतापलेल्या पोलिसांनी या नागरिकांनाच मारहाण करत, तिथून पळ काढला. यासंदर्भात दारूची पार्टी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.