भाजप नेत्यांवरील कारवाया पोहचल्या दिल्ली दरबारी! पंतप्रधान काय घेणार भूमिका?

155

सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते यांची चौकशी सुरु आहे. त्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थिती महाविकास आघाडीच्या सरकारनेही राज्यातील पोलीस यंत्रणेचा वापर करून भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारचे कट कारस्थान दिल्लीपर्यंत पोहचवले आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजते.

भाजपचे ‘हे’ नेते रडारवर 

महाविकास आघाडी  सरकारने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबै बँक प्रकरणात गुन्हे दाखल केला आहे, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तसेच आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे टार्गेटवर आहेत, अशा प्रकारे एक पाठोपाठ एक भाजपचे नेते आता महाविकास आघाडीच्या रडारवर येऊ लागले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्ली दरबारी तक्रार केली आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी राज्य सरकारच्या सूडबुद्धीने होत असलेल्या कारवायांची माहिती दिली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात यावर आता चर्चा सुरु झाली आहे.

(हेही वाचा महाविकास आघाडीचे १० मंत्री ‘टार्गेट’वर! काय म्हणाले चंद्रकांत पाटील?)

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लक्ष 

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्रीय तपास यंत्रणा या प्रामाणिकपणे कारवाई करत आहेत, असे असताना काही जण या यंत्रणांना प्रांतवाद, जातीवाद असा आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगत पंतप्रधानांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची पाठराखण केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवायांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य म्हटले आहे, अशा वेळी महाविकास आघाडीकडून होत असलेल्या कारवायांकडे पंतप्रधान कसे पाहतात, हे पहावे लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.