#TheKashmirFiles: गोवा, महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत ‘फिल्म जिहाद’

'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाबाबत दिल्लीत पोलीस सतर्क

147

देशात सध्या प्रत्येकाच्या तोंडात एकाच चित्रपटाचे नाव आहे, तो चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’. या चित्रपटाची जोरदार चर्चा असली तरी यावरून वाद देखील निर्माण झाले आहेत. एकीकडे हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी देखील केली जात आहे. त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने दोन्ही समुदायांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सर्व जिल्ह्यांच्या डीसीपींना दोन्ही समुदायांचे लोक राहत असलेल्या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषत: महिला पोलीस, पीसीआर आणि वाहतूक पोलीस कर्मचारीही तेथे तैनात केले पाहिजेत.

(हेही वाचा – #TheKashmirFiles: “… हा कोणता ‘राष्ट्र’वाद?”, हिंदू जनजागृती समितीचा सवाल)

स्पेशल सेल ब्रँचच्या पत्रात काय म्हटले?

विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आणि वास्तविक घटनांवर आधारित आहे. यामध्ये काश्मिरी हिंदूंच्या क्रूरतेचे चित्रण करण्यात आले आहे. काही लोक चित्रपटाला एकतर्फी असल्याचे सांगूत त्याला विरोध करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काही सिनेमागृहांमध्ये हिंसक घोषणाबाजीही झाल्याचे दिसले, असे स्पेशल सेल ब्रँचने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

फेब्रुवारी 2020 मध्ये ईशान्य दिल्लीत भीषण दंगली झाल्या आहेत असून हिजाबबाबत अजूनही वाद सुरू असून हरिद्वार धर्म संसदेत एका समुदायाच्या विरोधात बोलले गेले आहे. छोटीशी घटनाही दोन्ही समाजात तेढ निर्माण करू शकते हे नाकारता येणार नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती आहे. जिथे एक समुदाय या चित्रपटाच्या विरोधात आहे आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट देशभरात करमुक्त करण्याची मागणी इतर समाजाकडून होत आहे, असे या स्पेशल सेल ब्रँचने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

यासह असेही म्हटले की, या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता दिल्लीतील सर्व जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन सर्व जिल्हा डीसीपींनी आपापल्या भागात दोन्ही समाजातील लोक राहत असलेल्या ठिकाणी अधिकाधिक पोलीस बंदोबस्त ठेवावा. अशा ठिकाणी पीसीआर आणि वाहतूक पोलीसही तैनात करावेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.