आता बस्स…’मनसे’ नकोय परप्रांतीय कंत्राटदार!

149

२६ मार्चपासून आयपीएल २०२२ चा प्रारंभ होत असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. आता हळूहळू आयपीएलचे सर्व संघ मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. परंतु त्याआधीच यंदाच्या आयपीएलच्या हंगामाला गालबोट लागत आयपीएलमध्ये परराज्यातील कंपनीला कंत्राट दिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या बसची तोडफोड केली. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा : निधी वाटपात सरकारमधील तीन पक्षांत भेदभाव…फडणवीसांच्या टिकेला अजित पवारांचे उत्तर )

मनसेची मागणी

दिल्ली कॅपिटल्सची बस पार्किंगमध्ये उभी असल्याने यामध्ये कोणीही नव्हते. ताज हॉटेल येथे या बसची तोडफोड करण्यात आली आहे. आयपीएल संघांनी बसचे कंत्राट बाहेरील राज्यांना दिले म्हणून ही तोडफोड करण्यात आली. हीच कंत्राटे राज्यातील कंपन्यांना देण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.

मनसैनिकांना अटक

दरम्यान, याप्रकरणी मनसैनिकांवर कलम १४३, १४७, १४९ आणि ४२७ याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी प्रशांत गांधी, संतोष जाधव, बाजीराव कुंभार, भरमु नागरूनकर आणि देवेंद्र परमेकर या मनसैनिकांना अटक केली आहे.

गेली दोन वर्षे कोविडच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलसारख्या स्पर्धा मुंबईत होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे क्रिकेटप्रेमींना हे सामने पाहता यावेत त्याचबरोबर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुण्यातील अर्थव्यवस्थेला या स्पर्धेमुळे गती मिळावी या उद्देशाने बीसीसीआयशी चर्चा करुन आयपीएल-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.