कल्याणमध्ये मध्य रेल्वे विस्कळीत! रेल्वे रूळ तुटला

150
कल्याण येथे रेल्वे क्रॉसिंग येथील पॉईंट अचानक तुटल्यामुळे कल्याण येथे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लोकल सेवा तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे.

क्रॉसिंग पॉईंट तुटला

हा पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे. या पॉईंटवरून लोकल गाड्या असो किंवा मेल-एक्स्प्रेस असो रूळ बदलत असतात. या पॉईंटवरून कर्जत किंवा खोपोलीच्या दिशेने जाता येते. आता हा पॉईंट्च तुटल्यामुळे लोकल गाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाडया खोळंबल्या आहेत. विशेष म्हणजे कार्यालय सुटण्याची वेळ आहे. मुंबई वरून लाखो प्रवाशी मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमधून प्रवास करत आहेत, आता या गाड्या कल्याण येथे खोळंबल्याने पुढे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.