प्रविण दरेकरांना होणार अटक?

106

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजपा नेते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे दरेकर यांना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाने जामीन फेटाळला

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १९९, २००, ४०६, ४१७, ४२०, ४६५, ४६७ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी दरेकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. त्यात मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यांतर्गत अटक न करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

(हेही वाचा आदिवासी विकास मंत्री म्हणतात, आदिवासींना धर्म नसतो!)

रंगारी असल्याचे दाखवलेले

मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गातून निवडून आले होते. मात्र निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरूच ठेवली होती. दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून बँकेची निवडणूक लढविली होती, त्या प्रतिज्ञा मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखवण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.