मुंबई पोलिसांना मिळणार ‘ही’ होळीची भेट

150
राज्यातील फौजदार निवृत्ती वयापर्यंत पोलीस उप निरीक्षक होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्याची सुरुवात मुंबईपासून झाली आहे. मुंबईतील ४३ सहाय्यक फौजदार यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात ४३ जणांना बढती 

पोलीस दलात 30 वर्षे सेवा झालेल्या सहायक फौजदारांना पोलीस उप निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दक्षिण प्रादेशिक विभागातील 43 सहायक फौजदारांना या पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. या 43 सहायक फौजदारांना होळीची भेट मिळणार आहे. गुरुवारी, १७ मार्च रोजी पोलीस आयुक्तांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 43 जण पोलीस उप निरीक्षक बनणार आहेत, त्यानंतर सगळीकडे याची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या हस्ते पोलिसांना ही होळीची भेट देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.