आनंदाची बातमी! स्वराज्याची राजधानी रायगडसाठी घेण्यात आला ‘हा’ निर्णय

174

हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर अहोरात्र विद्युत रोषणाई व्हावी, यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून परवानगी मागण्यात आली होती. केंद्रीय पुरातत्व विभागाने यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता लवकरच स्वराज्याची राजधानी अहोरात्र उजळून निघणार आहे.

शिवप्रेमी आनंदी 

रायगडावर अहोरात्र वीजपुरवठा करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर, महावितरणने या ठिकाणी अत्यावश्यक असलेला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी रायगडावर विविध कामे सुरु केली आहेत. गडावर चार ठिकाणी विद्यूत रोहित्र व वितरण पॅनल बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आता शिवप्रेमी नागिरकांनी आनंद व्यक्त केला आहे.

संभाजीराजेंच्या प्रयत्नांना यश

रायगड प्राधिकरणाने रायगड किल्ल्यावरील विविध कामांकरिता मंजूर केलेल्या निधीतील सुमारे सात कोटी रुपयांचा निधी वीज वितरण कंपनी या नवीन भूमिगत केबल, रोहित्र व वितरण पॅनल यासाठी खर्च केला जाणार आहे. पुरातत्व विभागाने या कामासाठी परवानगी दिल्याने वीजपुरवठ्याचा मार्ग सुकर झाला आहे. मागील वर्षभरापासून वीज वितरण विभागाकडून केंद्रीय पुरातत्व विभागाकडे गडावरील या कामासाठी लेखी परवानगी तांत्रिक कारणास्तव लांबणीवर होती, परंतु रायगड प्राधीकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्ली येथील पुरातत्व खात्याकडे पाठपुरवठा करुन याबाबतची परवानगी मिळवली.

( हेही वाचा :का खेळले जातात होळीला रंग, जाणून घ्या काय आहे प्रथा ? )

मुसळधार आणि वादळी पावसाचा तडाखा

रायगड किल्ला उंचावर असल्याने या ठिकाणी मुसळधार तसेच वादळी पावसाचा मोठा तडाखा बसत असतो. यात गडावरील विजेचे खांब पडण्याचे, तसेच विजेच्या तार, रोहित्र व वितरण पॅनल पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन वीजवितरण कंपनीने सुमारे 11 किलोमीटर लांबीची भूमिगत केबल टाकली आहे. त्यामुळे भविष्यात अशा कोणाताही प्रकार घडण्याची शक्यता नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.