वरळी कोळीवाड्यातील होळीला अमित ठाकरेंची हजेरी!

127

Amitसराकरने कोरोनाचे अनेक निर्बंध शिथील केले आहेत. दोन वर्षांनंतर निर्बंधातून सूटका झाल्याने, मुंबईतल्या कोळीवाड्यांनी होळीच्या सणाला बुधवार पासूनच सुरुवात केली आहे.वरळी कोळीवाड्यात साजरी करण्यात आलेल्या होळीला मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. जुन्या परंपरा आणि चालीरिती जपत ही होळी जल्लोषात साजरी करण्यात आली.

निर्बंधमुक्त होळी

कोरोनाचे महासंकट आणि कोरोनाचे निर्बंध यातून सूटका झाल्यानंतर,आता होळी सणाच्या निमीत्ताने आयुष्यात अनेक रंग भरले जाणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त होळी खेळण्याचा आनंद लूटता येणार आहे. यावेळी मुंबईतील कोळी वाड्यांमध्ये जुन्या पारंपारिक चालीरिती नुसार होळी खेळण्यात आली. यावेळी कोळीबांधवांचा आनंद त्यांच्या चेह-यावरुन ओसंडून वाहत होता. मुंबईचा मूळ नागरिक असलेल्या कोळी समाजानं आपल्या जुन्या परंपरा आणि चालीरिती आजही जपल्या आहेत.

( हेही वाचा: कोट्यावधीच्या तोट्यात असणा-या महावितरणाचा ‘असा’ही महाविक्रम! )

राजकीय चर्चांना उधाण 

अमित ठाकरे यांनी वरळी येथील होळीला हजेरी लावली. पण, याने मात्र राजकीय चर्चांना उधाण आले, कारण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात ठाकरेंनी हजेरी लावली होती. यामागे महापालिका निवडणूक तर नाही ना, असे गणित बांधले जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेना अध्यक्ष अमितसाहेब राज ठाकरे यांनी वरळी कोळीवाडा येथे होलिकोत्सव सणानिमित्त वरळी गावातील मंडळांना सदिच्छा भेट दिली. सोबत स्थानिक नगरसेवक संतोष बाळकृष्ण धुरी, शाखाध्यक्ष विजय पाटील, म.न.वि.से. विभाग अध्यक्ष भावेश विरा, म.न.वि.से. विभाग अध्यक्ष अभिजित पाटील, म.न.वि.से. उपविभाग अध्यक्ष. हरेश कोळी, म.न.वि.से. उपविभाग अध्यक्ष परेश नार्वेकर, म.न.वि.से. वॉर्ड अध्यक्ष. भावेश कोळी, उप शाखाध्यक्ष संतोष लीडकर, परेश कोचरेकर, राकेश मेस्त, शरद पवार, संतोष पवार,महाराष्ट्र सैनिक मोहिंदर रासम, शशिकांत राऊत, सचिन महाडिक, मयूर मयेकर, पंढरी यादव, मयूर कदम, शशांक भातडे, नितीन पुलावले, भूषण पाटील, कुणाल राणे,सचिन मिसाळ, प्रथमेश पाटील, महिला महाराष्ट्र सैनिक राजेश्री संजय कोळी, संचिता संजय कोळी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.