महाराष्ट्रातील सत्तांतराविषयी नितीन गडकरींनी काय भाकीत केले?

125

भाजपने चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. याचप्रमाणे आता आगामी महापालिका निवडणुकांमध्येही भाजपला यश मिळावे याकरता सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी कामाला लागले आहेत. गोव्यात भाजपचे सरकार स्थापन होणार आहे या गोव्याच्या निवडणुकीचे प्रतिनिधीत्व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते त्यामुळे या यशाचे शिलेदार म्हणून देवेंद्र फडणवीसांचा नागपूर येथे सत्कार केला गेला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नितीन गडकरींनी महाराष्ट्रात पुन्हा भाजपचा भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : राज्यातील महिला सुरक्षित? चित्रा वाघ यांची थेट केंद्राला विचारणा अन् केली ‘ही’ मागणी )

काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी?

मी १९९५ पासून गोव्याचे कामकाज पाहत आहेत, अनुकूल परिस्थितीतही भाजपला गोव्यात एवढ्या जागा मिळाल्या नाही. असे गडकरी म्हणाले. मनोहर पर्रिकर असतानाही पूर्ण बहुमत नव्हते. परंतु यावेळीच्या निवडणुकांमध्ये गोव्याच्या जनतेने भाजपला पूर्ण बहुमत दिले यंदा देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण जबाबदारी होती. त्यांच्या साथीला प्रमोद सावंतही होते. या विजयासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फडणवीसांचे अभिनंदन केले.

भाजपला अपशकून करण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्रांमध्ये मुलाखती देऊन भाजपला कसे पराभूत करता येईल याचे प्रयत्न होत होते. परंतु गोव्याच्या जनतेने सिद्ध केले देवेंद्र फडणवीसांचे तिथे काय स्थान आहे. तसेच उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशमध्येही अभूतपूर्व सफलता मिळाली. सर्वांनी जात, पंत, धर्म, भाषा यापेक्षा आपल्या भवितव्याकरता भाजपवर विश्वास दाखवला हे या निवडणुकांचे श्रेय आहे. असेही गडकरी म्हणाले.

भारताला जगात नंबर वन करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न

या निवडणुकीने सिद्ध केले आहे की, जात, पंत, धर्म, पार्टी यापेक्षा लोक आपल्या भविष्याकरता आणि विकासाकरता मत देतात. आपण जातीयतेचे राजकारण समाप्त केले आहे. कार्यकरता हा जातीने, धर्माने श्रेष्ठ नसून तो त्यांच्या कार्याने, गुणांनी, कर्तृत्वाने श्रेष्ठ आहे. या संकल्पनेवर आपला विश्वास असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले. त्यामुळे जातीयवाद, अस्पृश्यता समूळ नष्ट करून, विकासाच्या मुद्द्यावर गाव, शेतकऱ्यांचे कल्याण करून सस्टेनेबल (Sustainable) जीवनपद्धती या गरीब माणसांना कशी देता येईल आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती कशी होईल आणि आपला देश जगभरात नंबर वन सुपर इकोनॉमिक पावर कसा होईल याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उराशी बाळगले आहे. आणि तेच पूर्ण करण्याचा आपण सर्व प्रयत्न करत आहोत. ‘सबका साथ सबका विश्वास और सबका प्रयास’ हे केवळ बोलण्यातून नाही तर कृतीतून दाखवले आहे आणि त्यातून हिंदुस्थानच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे. असे सांगत नितीन गडकरींनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले.

महाराष्ट्रातही आपला भगवा फडकणार 

जसं आपण देशभरात काम केले तशीच आपली कसोटी नागपूरात होणार आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहरासाठी मोठे योगदान दिले. चांगले रोड, खेळाची मैदाने दिली, भारत सरकारच्या वतीने आयए, आयआयटी, एम्स या संस्था तयार झाल्या. सिमबॉयसिस संस्थेत सध्या १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नागपूरात महापौरांनी सुंदर ई-लायब्ररी तयार केली. या शहरात सर्वात उंच फाऊंटेन तयार होणार आहे. रोजगार, क्रिडामहोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम येथे होतात. चार राज्यांत मिळवलेला हा विजय थांबणार नाही, एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. असे सांगत गडकरींनी मागच्या वेळेपेक्षा मोठं यश यंदा आपण महापालिका निवडणुकांमध्ये मिळवू असा संकल्प करूया असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.