Holi New Guidelines: आता बिनधास्त साजरी करा होळी आणि धुळवड!

226

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. 17 आणि 18 मार्चला होळी, धुलिवंदनचा सण आता बिनधास्त साजरा करता येणार आहे. कारण राज्याच्या गृह खात्याकडून जाहीर करण्यात आलेली नियमावली आणि निर्बंध हटविण्यात आले आहेत.

होळी, धुळवड साजरी करताना राज्य सरकारचे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत तसेच नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या परिपत्रकामुळे होळी साजरी करण्याचा मार्ग मात्र नक्की मोकळा झाला आहे.

ठाकरे सरकारचा यु-टर्न

दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत उशिरा का होईना अक्कल सुचली अशा खोचक टोला देखील लगावला आहे. बुधवारी राज्याच्या गृहखात्याने होळी, रंगपंचमी निमित्ताने मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या होत्या. यासंदर्भात भातखळकरांनी ट्वीट करत म्हटले की, कालचा निर्णय बहुधा गांजाच्या अंमलाखाली घेतला असावा, आज U Turn. म्हणे होळी-रंगपंचमीबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. चांगल आहे, ठाकरे सरकारला उशीरा का होईना अक्कल सुचली. 

वाचा काय आहे नवी नियमावली

  • कोविड महामारीमुळे गर्दी न करता शक्य तितके कोविड नियमांचे पालन करून होळी साजरी करावी.
  • एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी
  • होळी, शिमगा निमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.
  • गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.
  • कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानागरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.