प्रवीण दरेकरांना सोमवारी होणार अटक?

134

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे दरेकर यांना दिलासा मिळाला आहे.

उच्च न्यायालयाने फेटाळलेला जामीन 

प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता, त्यामुळे दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १९९, २००, ४०६, ४१७, ४२०, ४६५, ४६७ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणात कठोर कारवाई होऊ नये आणि दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांनी उच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळत त्यांना सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले होता, त्याप्रमाणे दरेकर यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

(हेही वाचा प्रविण दरेकरांना होणार अटक?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.