सिंधुदुर्गातील ‘ही’ पाच गावे शिमग्यापासून राहणार वंचित!

202

कोकणात गणपती उत्सवासोबतच शिमगोत्सवालाही अनन्यसाधारण महत्व आहे. मुंबईकर चाकरमानी वर्ग होळीला कोकणाची वाट धरतो. यासाठी एसटी प्रशासनानेही अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ५३९ ठिकाणी सार्वजनिक आणि ५८८ ठिकाणी खासगीरित्या होळी उत्सव साजरा केला जाणार आहे. तर मानपानावरून वाद असलेल्या पाच गावात होलिकोत्सवाला बंदी घालण्यात आली आहे.

( हेही वाचा : टेन्शन खल्लास! आता बिनधास्त साजरी करा होळी आणि धुळवड! )

या पाच गावात होलिकोत्सवाला बंदी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होलिकोत्सवाचा आजचा दहावा दिवस आहे. एकूण १ हजार १२७ ठिकाणी होळी साजरी केली जाणार आहे. मानपानावरुन वाद असलेल्या कोकिसरे, हुमरठ, मळेवाड, किर्लोस आणि भरणी गावात तहसीलदारांमार्फत क्रिमिनल प्रोव्हिजन कोड कलम १४४ प्रमाणे जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. शिमगोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात काही ठिकाणी दीड, पाच, सात, पंधरा दिवस होलिकोत्सव साजरा केला जातो. वैभववाडी तालुक्यात कोकिसरे, कणकवली तालुक्यात हुमरठ, सावंतवाडी तालुक्यात मळेवाड, मालवण तालुक्यातील किर्लोस, कुडाळ तालुक्यातील भरणी याठिकाणी कलम १४४ लागू करून होळी उत्सवास बंदी आदेश तहसीलदारांमार्फत लागू करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.