पोलंडची कॅरोलिना बिलावस्का ठरली नवी विश्वसुंदरी

भारताच्या मानसा वाराणसीचे भंगले स्वप्न

133

सौंदर्य स्पर्धांमध्ये अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या मिस वर्ल्ड २०२१ स्पर्धेत पोलंड येथील कॅरोलिना बिलावस्का हिने बाजी मारली आहे. यंदा पार पडलेल्या स्पर्धेच्या ७० व्या पर्वात ९७ देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची सैनी या स्पर्धेची प्रथम उपविजेते ठरली. तर कोटे डी आयव्होरच्या ऑलिव्हियाने दुसरे स्थान पटकावले. फस्ट रनर अप सैनी ही भारतीय वंशाची असून अमेरिकन नागरिक आहे. पोर्तो रिको हा अमेरिकेचा कॅरिबियनच्या ॲंटिल्स भागातील एक प्रांत आहे. त्याची राजधानी असलेल्या सॅन जुआन येथील कोरा कोला म्युझिक हॉलमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला.

(हेही वाचा -Holi New Guidelines: आता बिनधास्त साजरी करा होळी आणि धुळवड!)

जाणून घ्या कॅरोलिना बिलावस्काबद्दल…

कॅरोलिना बिलावस्का मॅनेजमेंटमध्ये मास्टर डिग्रीचे शिक्षण घेत आहे. हे केल्यानंतर तिला पीएचडीही करायची आहे. कॅरोलिनाला अभ्यासाची खूप आवड आहे. अभ्यासासोबतच ती मॉडेल म्हणूनही काम करते. पुढे तिला मोटिव्हेशनल स्पीकर बनायचे आहे. तिला पोहणे, स्कूबा ड्रायव्हिंग, टेनिस आणि बॅडमिंटन खेळायला आवडते.

२३ वर्षांच्या मानसा वाराणसीने भारताचे प्रतिनिधीत्व केले, पण या विजेतेपदावर नाव कोरण्यात ती अपयशी ठरली. मानसाचा जन्म हैदराबाद येथे झाला आणि मानसाने वसावी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले आहे. वाराणसीचा टॉप १३ स्पर्धकांमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र तिची टॉप ६ मध्ये निवड झाली नाही आणि मिस वर्ल्ड बनण्याचे तिचे स्वप्न भंगले. या आधी भारताच्या मानुषी छिल्लरने २०१७ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

मिस इंडिया २०२० चे परीक्षक फाल्गुनी शेन पीकॉक, नेहा धुपिया, चित्रांगदा सिंग आणि पुलकित सम्राट यांनी केले. अपारशक्ती खुराना यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात मानसा वाराणसीला मिस इंडिया वर्ल्ड २०२० चा मुकुट देण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.