उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फ्रूट ज्यूस, सरबत, लस्सी शीतपेय विक्रेते नागपूर शहरामध्ये जागोजागी व्यवसाय करीत असून सगळयांनी शुध्द पाण्यापासून बनविलेल्या बर्फाचा वापर करुन अन्न सुरक्षा व मानदे कार्यद्यांतर्गत परवाना व नोंदणी करुन व्यवसाय करावा. याबाबींचे उल्लंघन केल्यास अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षित व सकस आहाराबाबत जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
( हेही वाचा : तापमान गोंधळाची हॅट्रीक सुरुच! )
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना
नागपुरातील शाळांच्या 100 मीटर परिसरात सुगंधित तंबाखू, पानमसाला, गुटखा विक्री करणाऱ्या विक्रत्यांवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री वाहतूक करणाऱ्यांवर लवकरच धडक मोहीम राबविण्याच्या सूचना सदस्यांना दिल्या आहेत. शासनाने खाद्य बर्फ शुद्धा पाण्यापासून बनविले जावे व ते रंगहीन असावे, अशा सूचना दिल्या आहेत.याबाबींचे उल्लंघन केल्यास अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
लवकरच धडक मोहीम
अन्न पदार्थ तयार करताना खाद्यतेलाचा वारंवार तळण्यासाठी होणारा पुर्नवापर मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे आयोजित कार्यशाळेत देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळे मानवास कॅन्सर, हृदयविकारासह इतरही आजार उद्भवू शकतात. यानुषंगाने कार्यशाळेचे आयोजन नागपूर हॉटेल ओनर्स असोशिएशन महाल येथे करण्यात आले होते. ज्या अन्न व्यवसायिकांचे दैनंदिन खाद्यतेलाचे वापर पन्नास लिटरपेक्षा जास्त आहे, अशा अन्न व्यवसायिकांना वापर झालेल्या तेलाचा व उरलेल्या तेलाचा अभिलेखा ठेवण्याबाबत सूचना कार्यशाळेत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नमकिन, समोसा, कचोरी, पकोडे तळतांना खाद्यतेलाचा वारंवार पुर्नवापर होणार नाही, यासाठी अन्न प्रशासनामार्फत लवकरच धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community