सावधान! वर्तमानपत्रात बांधून दिलेले अन्नपदार्थ खाताय?

162

हॉटेल्स, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेते व्यावसायिकांनी यापुढे ग्राहकांना अन्नपदार्थ वर्तमानपत्रामध्ये न देण्याचे आवाहन रायगड जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल / घातक रंग असल्याने, गरम खाद्यपदार्थाच्या संपर्कात आल्यावर हे केमिकल विरघळते आणि ते आरोग्यास घातक असते, म्हणून वर्तमान पत्रात बांधून दिलेले अन्नपदार्थ खाण्यास मनाई केली जाते.

हा आहे उद्देश

अन्न सुरक्षा व मानके कायदा हा 05 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आला असून, या कायद्याचा प्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे. या कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबाजवणी करण्याचे कामकाज अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागामार्फत केले जाते.

आरोग्यास घातक

वर्तमानपत्राच्या कागदामध्ये अन्नपदार्थ गुंडाळून/बांधून ग्राहकांना देण्याची प्रथा सर्रास दिसून येते. परंतू वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल / घातक रंग असल्याने गरम खाद्यपदार्थाच्या संपर्कात आल्यावर हे केमिकल विरघळते आणि ते आरोग्यास घातक असल्यामुळे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास मनाई केली आहे.

( हेही वाचा आता ‘एसटी’ च्या बसगाड्या खाजगी पेट्रोल पंपावर डिझेल भरणार! काय म्हटले पत्रकात, वाचा )

अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

त्यामुळे वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी करता येणार नाही. वर्तमानपत्र किंवा मासिकाचा कागद अधिक आकर्षित बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. विशेषतः वयोवृध्द व लहान मुलांसाठी हे जास्त धोकादायक आहे. रायगड जिल्ह्यातील हॉटेल्स, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेते व्यावसायिकांनी यापुढे ग्राहकांना अन्नपदार्थ वर्तमानपत्रामध्ये न देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.