‘द काश्मीर फाइल्स’ या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्र सरकारने ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. हा चित्रपट 11 मार्चला प्रदर्शित झाला. आठवड्याभरात या चित्रपटाने करोडोंची कमाई केली आहे. सध्या या चित्रपटाची संपूर्ण देशात जोरदार चर्चा आहे. द काश्मीर फाइल्स या चित्रपटात 1990 मध्ये काश्मिर खोऱ्यातील काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे.
म्हणून ‘वाय’ सुरक्षा
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक गट या चित्रपटाच्या समर्थनार्थ, तर एक गट विरोधी आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना अनेक धमकीचे फोनही आले. त्यामुळे त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. अग्निहोत्रींच्या सुरक्षेसाठी चार ते पाच सशस्त्र कमांडो तैनात करण्यात आले असून, भारतभर प्रवासादरम्यान CRPF कडून त्यांचं रक्षण केलं जाणार आहे.
Film director Vivek Agnihotri has been given 'Y' category security with CRPF cover pan India: Government Sources
(File photo) pic.twitter.com/63l1B0BlMz
— ANI (@ANI) March 18, 2022
( हेही वाचा :मच्छीमारांनो काळजी घ्या! ‘असनी’चे संकट घोंघावतेय )
काय असते ‘वाय’ सुरक्षा
यामध्ये एकूण 11 सुरक्षा कर्मचारी सहभागी असतात. ज्यात दोन PSO (खाजगी सुरक्षा रक्षक) देखील आहेत. जिवाला धोका असलेल्या देशातील आदरणीय लोक आणि राजकारण्यांना ही सुरक्षा दिली जाते. ही सुरक्षा मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेपेक्षा वेगळी आहे. या सुरक्षेसाठी आधी सरकारला अर्ज द्यावा लागतो, त्यानंतर सरकारला गुप्तचर यंत्रणांमार्फत धोक्याचा अंदाज येतो. धमकीची पुष्टी झाल्यावर सुरक्षा दिली जाते. गृहसचिव, महासंचालक आणि मुख्य सचिवांची समिती संबंधित लोकांना कोणत्या श्रेणीचे संरक्षण द्यायचे याचा निर्णय घेते.