पैठणीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या येवल्यात पैठणी खरेदीसाठी आलेल्या दोन महिलांनी तब्बल 75 हजार रुपये किमतीच्या तीन महाराणी पैठणी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथे हा प्रकार घडला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अन् चोरली महाराणी
येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथे ‘लावण्या पैठणी’ या शोरूममधून चक्क पैठणीचीच चोरी करण्यात आली आहे. #CCTV @SPNashikRural @nashikpolice @InfoNashik #HindusthanPost pic.twitter.com/dFS1az12Yn
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 18, 2022
येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथे नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर असलेल्या ‘लावण्या पैठणी’ या शोरूममध्ये 12 मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दोन महिला पैठणी खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी घरात लग्न असल्याने, महागड्या आणि दर्जेदार पैठणी दाखवण्याची मागणी केली. म्हणून या महिलांना 25 हजार रुपयांची महाराणी पैठणी दाखवण्यात आली. यात आणखी व्हरायटी दाखवण्याची मागणी त्या महिलांनी केली. या दरम्यान या दोन्ही ग्राहक बनून आलेल्या महिलांनी दुकानदार व कामगारांची नजर चुकवून पंचवीस हजार रुपये किमतीच्या तीन महाराणी पैठण्या चोरून नेल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
( हेही वाचा: ‘द काश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाला सुरक्षेचे ‘वाय’ कवच! )
‘असा’ झाला खुलासा
17 मार्च रोजी दुकानांमधील महाराणी पैठणीचा स्टॉक चेक करत असताना, तीन महाराणी पैठण्या कमी असल्याचे लक्षात आले. यावेळी सीसीटीव्ही कॅमे-यातून तपासणी केली असता, या दोन भामट्या महिलांनी महाराणी पैठणीची चोरी केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात लावण्या पैठणीचे मालक आकाश ठोंबरे यांनी तक्रार दाखल केली असून, येवला तालुका पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे या दोन भामट्या महिलांचा शोध घेत आहेत.
Join Our WhatsApp Community