रेल्वे प्रवाशांचे ‘हे’ आहेत तारणहार !

240

रेल्वे सुरक्षा दल (RPF) कर्मचारी नेहमीच आघाडीवर कार्यरत असतात आणि केवळ रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीच नव्हे, तर ते जीव वाचवणारे, पळून गेलेले चिल्ड्रन रेस्क्यूअर्स, लगेज रिट्रीव्हर आणि रेल्वेमार्गे अंमली पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी चोवीस तास जागरुक असतात.

अनेकांचे वाचवले प्राण

फेब्रुवारी-२०२२ मध्ये, मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल जवानांनी “मिशन जीवन रक्षक” चा एक भाग म्हणून काही वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून, ७ जणांचे प्राण वाचवले आहेत. यापैकी काही जीव वाचवणाऱ्या घटनांचे व्हिज्युअल प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये सतर्क रेल्वे सुरक्षा दलातील जवानांनी अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काही वेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचवला गेला आहे. पण सरतेशेवटी, तारणकर्त्यांच्या या कृतीचा परिणाम आनंददायी आणि रेल्वे सुरक्षा दल जवानांप्रती कृतज्ञता यात होतो.

आपली जबाबदारी चोख निभावतात

रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे,आत्यंतिक हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा आणणे, बेपत्ता मुलांची सुटका करणे आणि गाड्या तसेच रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे अशा विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. या सगळ्यात ते प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवून असतात.

( हेही वाचा: आता निवडणुकीत जिंकले तरी २०२४मध्ये तूमच्या विरोधातच लढणार; बायकोचे नवऱ्याला आव्हान! )

आरपीएफ जवानांच्या कार्याला सलाम

मध्य रेल्वे आरपीएफ दलाने ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ६६ मुले आणि ३६ मुलींसह एकूण १०२ पळून आलेल्या मुलांना शोधून सुटका केली आहे. ऑपरेशन अमानत अंतर्गत, रु. २० लाख ०३ हजार ८७२ किंमतीचे १०४ नग सामान परत देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त आरपीएफ जवानांनी उत्तम नियोजन आणि रणनीती वापरून रेल्वेमार्गे अंमली पदार्थांच्या व्यापाराच्या ३ प्रकरणांचा पर्दाफाश केला आणि रु. ८ लाख १३ हजार ९५० इतकी रक्कम वसूल केली. ऑपरेशन मैत्रीशक्ती अंतर्गत एक प्रकरण देखील नोंदवले गेले आहे ज्या अंतर्गत RPF कर्मचा-यांनी प्रवासादरम्यान / रेल्वे परिसरामध्ये प्रसूती झालेल्या गर्भवती महिलेला मदत केली आहे. रेल्वे सुरक्षा दलातील या शूर जवानांच्या कार्याला सुरक्षा, सतर्कता आणि सेवा असे संक्षेपात सांगता येईल आणि त्यांनी अत्यंत समर्पणाने आणि धैर्याने आपली कर्तव्ये पार पाडली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.