बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर 200 हून अधिक लोकांच्या जमावाकडून हल्ला!

205

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉन राधाकांता मंदिरावर गुरुवारी संध्याकाळी जमावाने हल्ला केला. होळीच्या एक दिवस आधी हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तोडफोड करण्यात आली असून जमावाने काही मौल्यवान वस्तूही लुटल्या. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. हाजी सैफुल्लाच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक लोकांच्या जमावाने हा हल्ला केला होता. यावेळी मंदिराची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली.

(हेही वाचा – आम्हाला पण तुमच्यात घ्या ना! कमकुवत झालेल्या काँग्रेसची ‘आप’ला हाक)

या घटनेचा इस्कॉन इंडियाकडून निषेध

झालेल्या या घटनेचा इस्कॉन इंडियाकडून निषेध करण्यात आला आहे. इस्कॉन इंडियाचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या घटनेचा निषेध करत ते दुर्देवी असल्याचे सांगितले आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केले आहे. डोल यात्रा आणि होळी उत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेली ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी १५ मार्च हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला. हजारो असहाय्य बांगलादेशी आणि पाकिस्तानी अल्पसंख्याकांच्या दु:खाबद्दल तेच संयुक्त राष्ट्र मूक भूमिका घेत आहे याचे आम्हाला आश्चर्य वाटते असे राधारमण दास म्हणाले.

बांगलादेशात हिंदू मंदिरावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी गेल्या वर्षी नवरात्रीला हिंदूंविरोधात अफवा पसरवून दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले करण्यात आले होते. एवढेच नाही तर हिंदूंच्या घरांवरही हल्ले झाले. त्यावेळी ढाका येथील इस्कॉन मंदिरावरही हल्ला करण्यात आला होता. इस्कॉनचा भाग असलेल्या ढाक्यातील राधाकांता मंदिरात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या हल्ल्याचे काही फोटो आणि माहिती शेअर केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.