शनिवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद आणि वार्षिक अधिवेशन पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स क्लबमध्ये झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या परिषदेसाठी धुलीवंदनाच्या दिवशी देखील राज्यभरातून हजारो शिक्षक हजर झाल्याचे दिसून आले.
पवारांनी दिली अशी ग्वाही
यावेळी शरद पवारांनी शिक्षकांना आश्वासन देत असे म्हटले की, शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न उद्याच्या उद्या सोडवू असे नाही, तर आता अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन संपल्यावर आम्ही सर्व नेते मंडळी एकत्र बसून यातून नक्की मार्ग काढू, असेही सांगून ग्वाही देखील दिली.
(हेही वाचा – राज्यातील जनता कशाने झालीये हैराण?)
शिक्षक वर्गाने केली ही मागणी
जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख मागणी यावेळी सर्व शिक्षक वर्गाने लावून धरली होती. तर, यावर मी स्वतः सर्व प्रमुख नेत्यांच्या बैठकीत यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन पवारांनी शिक्षकांना दिले.