औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते. औरंगाबादला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पर्यटक या शहरातील अनेक स्थळांना भेटी देतात त्यावेळी पर्यटकांना या स्थळांविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते परंतु अनेकवेळा माहिकीकरता लावलेले बोर्ड खराब स्थितीत असतात. याच पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व विभागातर्फे एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आता औरंगाबादमध्ये पर्यटकांना माहिती देण्यासाठी जागोजागी क्यू आर कोडचा वापर केला जाणार आहे.
क्यू आर कोडचा वापर
औरंगाबादमध्ये विविध पर्यटनस्थळे आहेत. याविषयी माहिती देण्यासाठी जागोजागी क्यू आर कोड (QR Code scan) लावण्यात आले आहेत. हा कोड मोबाईल फोनवर स्कॅन करावा लागतो. यानंतर आपल्याला संबंधित पर्यटनस्थळांची सखोल माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यामध्ये मराठीसह अन्य भाषेचाही समावेश असणार आहे. या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांची माहिती उपलब्ध होण्याचे प्रमाण शंभर टक्के नसले तरी 85 ते 90 टक्के होऊ शकते, असे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या योजनेता पर्यटकांनी लाभ घ्यावा असेही विभागाने सांगितले आहे.
( हेही वाचा : १२ ते १४ वयोगटातील मुलांचे ‘या’ जिल्ह्यांमध्ये शून्य लसीकरण! )
औरंगाबाद जिल्ह्यात बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, अजंठा-वेरूळ लेणी येथे पर्यटकांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी क्यू आर कोड लावण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community