मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर; हार्बर मार्गावर होणार हाल

147

रविवारी रेल्वे प्रवास करताना अलिकडे सगळेच मुंबईकर मेगाब्लॉकची वेळ पाहून घराबाहेर पडतात. परंतु येत्या रविवारी मध्य रेल्वेचे प्रवासी बिनधास्त घराबाहेर पडू शकतात. रविवार, २० मार्च २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत कोणत्याही स्थानकादरम्यान मेगाब्लॉक नसेल असे मध्य रेल्वेने स्पष्ट केलेले आहे. येत्या रविवारी केवळ हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : फक्त ‘दोन’ रूपयांत चार्ज करा इलेक्ट्रिक गाडी )

हार्बर मार्गावर या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक असणार आहे..

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि
चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

या रेल्वेगाड्या रद्द

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द केल्या आहेत.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द
  • गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द

विशेष सेवा

  • मेगाब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे.

प्रशासनाने केली व्यक्त दिलगिरी

हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.