मितालीचे विक्रमी ‘राज’

153

सध्या सर्वत्र आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेची चर्चा आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ चांगली कामगिरी करत आहे. कर्णधार मिताली राजने आयसीसी महिला विश्वचषकाच्या १८ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध शानदार अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकाच्या जोरावर मितालीने विक्रमाची नोंद केली आहे. एकदिवसीय कारकिर्दीतील हे मितालीचे ६३ वे अर्धशतक आहे. तिने विश्वचषकात सर्वाधिक ५० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडची माजी खेळाडू डेबी हॉकलीची बरोबरी केली आहे. मितालीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने २७७ धावांपर्यंत मजल मारली.

( हेही वाचा : …तर होईल कॅन्सरचा धोका कमी )

मितालीचा ‘राज’

गेले अनेक दिवस मितालीचा खराब फॉर्म चिंतेची बाब ठरत होती. परंतु ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात मितालीला सूर गवसला आहे. भारतीय संघाचा डाव मोडकळीस आला असतानाच, मितालीने दमदार अर्धशतक ठोकले. मितालीने विश्वचषकात सर्वाधिक ५० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडची माजी खेळाडू डेबी हॉकलीची बरोबरी केली आहे. या दोन्ही खेडाळूंनी विश्वचषकात एका डावात १२ वेळा, ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याच्या विक्रमाची नोंद केली आहे.

तिसऱ्या बळीसाठी शतकी भागीदारी

कर्णधार मिताली राज फलंदाजीला आली तेव्हा भारतीय संघाचे २८ धावांवर २ बळी गेले होते. यानंतर आपल्या अनुभवाचा वापर करत मितालीने तिसऱ्या बळीसाठी शतकी भागीदारी केली आणि संघाला एका मजबूत स्थितीत आणून ठेवले. मिताली राजने या सामन्यात ९६ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. तिला साथ देत भारतीय संघाची उपकर्णधार हरमनप्रीत-कौरने  ४७ चेंडूत ५७ धावांची नाबाद खेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.