भारताला ताकद दाखवायला गेला आणि तोंडावर आपटला! असा झाला पाक अयशस्वी

या अयशस्वी चाचणीचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. 

139

काही दिवसांपूर्वी भारताचे ब्रह्मोस मिसाईल चुकून पाकच्या हद्दीत पडले. त्यानंतर भारताला आपली ताकद दाखवण्यासाठी पाकने देखील सिंध येथील रेंजवरुन गुरुवारी मिसाईलची चाचणी केली. पण ही चाचणी अयशस्वी झाली असून, हे मिसाईल पाकच्याच हद्दीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

प्रक्षेपणानंतर काही क्षणांतच हे मिसाईल नियोजित मार्गावरुन खाली उतरत सिंध प्रांताताली थाना बुला खानजवळ कोसळल्याचे वृत्त मिळत आहे. भारताचे मिसाईल पाकच्या हद्दीत पडल्यानंतर त्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून ही चाचणी घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकची अयशस्वी मिसाईल चाचणी

पाकिस्तानी न्यूज एजन्सी कॉनफ्लिक्ट न्यूज पाकिस्तानने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. भारताच्या ब्रह्मोस मिसाईलला प्रत्त्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने या मिसाईलची चाचणी घेतली होती. पण पाकिस्तानचे हे मिसाईल नियोजित ठिकाणापर्यंत पोहोचू शकले नाही आणि ते काही क्षणांतच कोसळले. सिंध प्रांतातील जामशोरो जवळील परिसरातून ही अयशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे कॉनफ्लिक्ट न्यूज पाकिस्तानने ट्वीट करत म्हटले आहे. या अयशस्वी चाचणीचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

गुरुवारी जामशोरो भागातील रहिवाशांनी एक अज्ञात वस्तू आकाशातून कोसळत असल्याचे पाहिले. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही चाचणी पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आली असून घाबरण्याचे काही कारण नसल्याचे पाकिस्तानी संरक्षण विश्लेषक AEROSINT Division PSFने आपल्या ट्विटर हँडल वरुन ट्वीट करत म्हटले आहे.

https://twitter.com/PSFAERO/status/1504393394415706115?s=20&t=QUIZCbQDdTbWzM_A802Ltw

भारतातून बुधवारी, 9 मार्च रोजी चुकून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडले होते. भारताने या घटनेबद्दल खेद व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भारतीय क्षेपणास्त्रामुळे नुकसान झाल्याचे सांगितले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.