‘टीईटी’ घोटाळ्यामुळे संपूर्ण शालेय शिक्षण विभाग बदनाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील प्रत्येक विभागाला भेट देत तब्बल चार तास तळ ठोकून अधिकारी, कर्मचाऱ्यांची ‘झाडाझडती’ घेतली.
अपात्र उमेदवार पात्र
यामुळे अधिकारी, कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात ‘टीईटी’सारख्या कोणत्याच घोटाळ्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेत पारदर्शक कामे करा, असे आदेशही सूरज मांढरे यांनी बजाविले आहेत. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून ‘टीईटी’च्या निकालात फेरफार करून अपात्र उमेदवारांना पात्र करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांसह परीक्षांचे कामकाज करणाऱ्या खासगी एजन्सीच्या संचालकांना अटक केली आहे. दरम्यान शिक्षण आयुुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सूरज मांढरे यांनी सर्वात आधी परीक्षा परिषदेच्या कार्यालयाला भेट देण्याचा निर्णय घेत त्याची होळीच्या मुहुर्तावर तत्काळ अंमलबजावणीही केली. आतापर्यंत परीक्षा परिषदेत येवून सर्व विभागांना भेटी देणारे मांढरे हे पहिलेच आयुक्त असून त्यांची ही कामकाजाची ‘डॅशिंग’ पद्धत नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
(हेही वाचा आता ‘द गोवा फाईल्स’ चित्रपटाची मागणी! कोणी आणि कसे केले होते हिंदूंवर अत्याचार?)
Join Our WhatsApp Community