सण-उत्सव, लागोपाठ सुट्ट्या आल्या की, मुंबईकर चाकरमानी वर्ग मोठ्या प्रमाणात कोकणाची वाट धरतो. परंतु आता कोकण रेल्वेने प्रवाशांना आनंदाची बातमी दिली आहे. आता कोकण रेल्वेचा प्रवास सुसाट होणार आहे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा यंत्रणेकडून २२ आणि २४ मार्च २०२२ रोजी या विद्युतीकरणाची तपासणी होणार आहे. त्यामुळे आता लवकरच कोकण रेल्वे विजेवर धावणार आहे.
होणार वेळेची बचत..
संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर ६ ते ७ वर्षांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू होते. गेल्या काही महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव -थिवी या मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी याबद्दलची तपासणी केली होती. त्याच्या आधी कारवार-ठोकूर आणि रोहा-रत्नागिरी या टप्प्यांचे विद्युतीकरण झाले होते. मुंबई ते रत्नागिरी असे कोकण रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाड्या आणि दिवा-रत्नागिरी पॅसेंजर विद्युत इंजनावर चालवली जाते. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
( हेही वाचा : कोकणवासीयांसाठी रेल्वे आली धावून… )
प्रदूषणमुक्त प्रवास
आता रत्नागिरी ते वेर्णा या टप्प्यातील विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. याची तपासणी २२ आणि २४ मार्चला रेल्वे सुरक्षा अरोरा यांच्या मार्गदर्शनखाली केली जाणार आहे. या विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचा वेग आता वाढणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होऊन त्यांना प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community