डीसीपी सौरभ त्रिपाठींना २३ मार्चपर्यंत दिलासा

158

मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर वसुलीचे आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकू लागली, त्यानंतर आता अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्रिपाठी यांच्या याचिकेवर २३ मार्च रोजी फैसला होणार आहे. त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे की, यापूर्वी एफआयआरमध्ये त्यांचे नाव नव्हते आणि पोलीस ठाण्याच्या स्तरावर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहितीही त्यांना नव्हती.

त्रिपाठी यांच्या याचिकेवर आता २३ मार्चला सुनावणी होणार असून त्यानंतर त्रिपाठी यांना अटकेतून दिलासा द्यायचा की नाही, याबाबत न्यायालय निर्णय देऊ शकते. या प्रकरणी मुंबई क्राइम ब्राँच ३ पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, जे एलटी मार्ग पोलीस ठाण्यात तैनात होते. या प्रकरणी सीआययूने पीआय ओम वंगाटे एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांना अटक केली आहे. याप्रकरणी क्राईम ब्रँचने 16 मार्च रोजी त्रिपाठीला वॉन्टेड रिमांडवर बोलावले होते.

(हेही वाचा आता ‘द गोवा फाईल्स’ चित्रपटाची मागणी! कोणी आणि कसे केले होते हिंदूंवर अत्याचार?)

आरोप काय होता?

क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंगडिया असोसिएशनने गेल्या वर्षी ७ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती, त्रिपाठी यांनी दरमहा १० लाख रुपयांची मागणी केली. त्रिपाठी यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. मुंबई पोलिसांनी त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे पाठवला आहे. पोलिसांनी त्यांच्या प्रस्तावात आरोप केला आहे की ते त्रिपाठी यांच्यावरील वसुलीच्या आरोपांच्या तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्रिपाठी यांच्यावर या प्रकरणाशी संबंधित अंगडियाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्रिपाठी यांनी तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचा आरोप आहे. त्रिपाठी आणि अंगडिया यांच्यातील या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग मुंबई पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. हे कॉल रेकॉर्डिंग स्वत: अंगडियाने (तक्रारदार) मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.