चहा अशी वस्तू आहे की तिचा एक घोट घेतल्याबरोबर तरतरी येते, उत्साहवर्धक पेय आहे. त्यामुळे चहा नको म्हणणारे तुम्हाला क्वचितच सापडतील, म्हणूनच चहा इन्डस्ट्री ही तेजीत आहे. मात्र या चहासाठी लागणा-या वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे साहजिकच चहाचे दर वाढलेले आहेत. त्याचा चटका मात्र सर्व सामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
टी कॉफी असोसिएशनचा निर्णय
वाढत्या महागाईमुळे साखर, दूध, चहा व कॉफीचे इतर घटक पदार्थ यांच्या वाढलेल्या किमती म्हणून चहा व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे, असे टी कॉफी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणून चहा व कॉफी असोसिएशनने चहा व कॉफीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एका बाजुला वाढलेले इंधन दर, तर दुसर्या बाजुला ही दरवाढ आहे. या वाढत्या किमतीमुळे 5 रुपयांना मिळणारा चहा आता 7 ते 10 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. सामान्य माणसाला आधीच महागाईच्या झळा पोहचत आहेत. त्यातच आता रोज सकाळी ताजेतवाना करणारा चहादेखील महाग झाला. सध्या गल्लोगल्ली चहाची दुकाने सुरू आहेत, त्यामुळे चहा उद्योगातून लाखोंची उलाढाल होत असते, अशा वेळी या महत्वाच्या उद्योगात दरवाढ ही थेट सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे.
(हेही वाचा राणे म्हणतात… ‘आता फक्त इसिसचा प्रस्ताव येणं बाकी आहे’)
Join Our WhatsApp Community