स्वामी यतिंद्रानंद गिरी म्हणाले…’द काश्मीर फाइल्स’चा भाग-2 बनवा!

127

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मिरातील अत्याचाराची थोडक्यात माहिती देणारा आहे. याचाही भाग-२ बनवावा, तसेच भारताच्या फाळणीवरही आधारित चित्रपट तयार व्हायला हवा, अशी अपेक्षा जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरी यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे लागेल. भारतातील मोदी सरकारमुळेच ‘द काश्मीर फाइल्स’सारखा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला आणि सत्य भारतातील जनतेसमोर आले, असेही ते म्हणाले.

दीडशे साधू-संतांसाठी खास शो

श्रीपंच दशनम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आणि जीवनदीप आश्रम रुडकीचे पीठाधीश्‍वर स्वामी यतिंद्रानंद गिरी यांनी संत आणि पत्रकारांसाठी रुडकीच्या नीलम टॉकीजचा संपूर्ण शो बुक केला होता. यावेळी स्वामी यतिंद्रानंद गिरी म्हणाले की, हा शो खास हरिद्वार आणि मेरठ भागातील सर्व ऋषी-मुनींसाठी होता. चित्रपट पाहण्यासाठी सुमारे दीडशे ज्येष्ठ साधू-संत एकत्र आले होते. यावेळी श्री अवधूत मंडळ आश्रम बाबा हिरा दास हनुमान मंदिराचे पीठाधीश्‍वर महंत स्वामी संतोष आनंद देव महाराज म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात हिंदूंचे मनोबल उंचावले आहे. भारतासारख्या देशात काश्मीर फाइल्सचे चित्रपट दाखवणे इतके सोपे नव्हते, पण भारत सरकारच्या भक्कम भूमिकेपुढे देशद्रोह्यांचे काही चालले नाही. यावेळी महामंडलेश्वर प्रबोधानंद गिरी, महामंडलेश्वर शिव प्रेमानंद, संपूर्णानंद गिरी, कमल भारती आदी आखाड्यांचे प्रमुख संत उपस्थित होते.

(हेही वाचा आता ‘द गोवा फाईल्स’ चित्रपटाची मागणी! कोणी आणि कसे केले होते हिंदूंवर अत्याचार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.