सध्या देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असलेल्या द काश्मीर फाइल्स चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका जम्मूच्या स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्या चित्रपटाला स्थानिक न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला.
Case filed against #KashmirFiles settled in Jammu Court.
Matter resolved to the complete satisfaction of parties.
Restraining Order vacated. Case disposed of. No hindrance now@vivekagnihotri ; Director Kashmir Files was represented by Advocate J&K High Court @AnkurSharma_Adv
— Ankur Sharma (@AnkurSharma_Adv) March 19, 2022
न्यायालयाने आणलेली बंदी
या चित्रपटात भारतीय वायू सेनेतील दिवंगत अधिकारी रवी खन्ना यांच्यावर एक दृश्य चित्रित करण्यात आले आहे. त्याला त्यांची पत्नी निर्मला खन्ना यांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयाने या दृष्यांवर बंदी आणली होती. मात्र शनिवारी, २० मार्च रोजी यावर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयात दोन्ही बाजुंकडून सहमती मिळाल्याने अखेर न्यायालयाने चित्रपटावरील बंदी हटवली. या याचिकेत चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील अंकुर शर्मा यांनी युक्तिवाद केला.
जम्मूच्या स्थानिक न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश दीपक सेठी यांनी चित्रपटावर बंदी आणण्याचा आदेश दिला होता. परंतु दोन्ही बाजूंच्या पक्षकारांमध्ये सहमती निर्माण झाल्याने बंदी उठवण्यात आली.
– वकील अंकुर शर्मा
काय आहे ते दृश्य?
२५ जानेवारी १९९० रोजी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष यासीन मलिक याने हल्ला केला होता, त्यामध्ये भारतीय वायू सेनेचे ४ अधिकारी ठार झाले होते, त्यामध्ये रवी खन्ना हे होते. चित्रपटात खन्ना यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community