मुंबई इंडियन्सला धोका कोणाचा?

144

२०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच वेळा IPL स्पर्धेची विजेतेपद मुंबई इंडियन्सने मिळवली आहे. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. यंदा टीम पुन्हा एकदा विजेते पदासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र यावेळी टीमकडे हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या किंटन डीकॉक आणि राहुल चहर सारखे खेळाडू असणार नाही ज्यांनी संघाला चॅम्पियन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु यावेळी मुंबई इंडियन्सला सर्वात धोका आहे तो म्हणजे जखमी खेळाडू.

दरम्यान, गेल्या हंगामात दमदार खेळाडू असताना देखील मुंबईला प्ले ऑफमध्ये जागा मिळवता आली नव्हती. आता कर्णधार रोहित शर्मावर पुन्हा एकदा संघाला चॅम्पियन करण्याची जबाबदारी आहे.

जखमी खेळाडू मुंबईसाठी सर्वात धोकादायक?

एखादा खेळाडू जखमी झाल्यास बॅकअपचे फार कमी पर्याय आहेत. जोफ्रा आर्चर या हंगामात खेळणार नाही. रोहित शर्मा देखील गेल्या काही महिन्यात अनेक वेळा दुखापतीमुळे बाहेर झालाय. गेल्या ३ हंगामाचा विचार करता दुखापतीमुळे तो काही सामने खेळू शकला नव्हता. जर पुन्हा असे काही झाले तर संघासाठी याच जखमी खेळाडूंचा मोठा धोका ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघात कोणाचा सहभाग

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह , सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन, देवाल्ड ब्रेविस, बासिल थम्पी, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, एन टिळक वर्मा, संजय यादव,जोफ्रा आर्चर, डेनियल सॅम्स, टायमल मिल्स, टीम डेव्हिड, रिले मेरेडिथ, मो.अरशद खान, अनमोलप्रीत सिंह, रमनदीप सिंह, राहुल बुद्धी, ऋतिक शौकिन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन एलन.

मुंबई इंडियन्स २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या लिलावाच्या आधी संघाने कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड यांना रिटेन केले होते. तर मेगा लिलावात ईशान किशनला १४.२५ कोटींना खरेदी केले होते. मुंबईने याआधी कधीच लिलावात १० कोटीपेक्षा अधिक रक्कम एखाद्या खेळाडूवर खर्च केली नव्हती. सिंगापूरचा विस्फोटक खेळाडू टीम डेव्हिडवर मुंबईने ८.२५ तर दुखापतीने मैदानाबाहेर असलेल्या जोफ्रा आर्चरवर ८ कोटींची बोली लावली. दुखापतीमुळे आर्चर या हंगामात एकही सामने खेळू शकणार नाही. मुंबई इंडियन्स हंगामातील पहिली मॅच २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.