महाराष्ट्र शासनाने नव्या अधिनियमानुसार आता राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे, असं क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं आहे. राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाची माहिती त्यांनी नागपूरात पत्रकारांना दिली.
‘असे’ दिले जाणार बोनस गुण
त्यानुसार एनसीसीचे ‘क’ प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहे, त्यांना पोलीस भरतीच्या परीक्षेच्या एकूण गुणांच्या 5 टक्के अधिक बोनस गुण दिले जातील. ‘ब’ प्रमाणपत्र प्राप्त असणाऱ्यांना 3 टक्के, तर एनसीसी ‘अ’ प्रमाणपत्र प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एकूण गुणांच्या 2 टक्के अधिकचे बोनस गुण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
( हेही वाचा: अरेरे ! ‘जागतिक वन दिनी’च ‘या’ जंगलाला लागली भीषण आग )
एनसीसीच्या माध्यमातून शोचं आयोजन
त्यामुळे आता एनसीसीच्या हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. एनसीसी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये अतिरिक्त गुण देण्यासंदर्भातील शासन निर्णय आणि राजपत्रदेखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सुनील केदार यांनी नागपुरात 27 तारखेला एअरो मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. नागपुरात आयोजित करण्यात येत असलेला हा शो विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे, असं सुनील केदार म्हणाले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण होणार आहे, उत्साह निर्माण होणार आहे. एनसीसीच्या माध्यमातून या शोचं आयोजन होणार आहे, असं सुनील केदार म्हणाले.