रशिया- यूक्रेन युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे पार्थिव भारतात!

177

रशिया- यूक्रेन संघर्षात गेल्या 1 मार्च रोजी मृत्युमुखी पडलेल्या कर्नाटकच्या नवीन शेखरप्पा यांचे पार्थिव सोमवारी बंगळुरू येथे दाखल झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि आरोग्य मंत्री डॉ. के सुधाकर यावेळी उपस्थित होते, तसेच मान्यवरांनी नवीन शेखरप्पा यांच्या पार्थिवास श्रद्धांजली अर्पण केली.

सरकार करणार आर्थिक मदत

यावेळी बसवराज बोम्मई म्हणाले की, “वैद्यकीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा यांचे पार्थिव भारतात आणल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. रशिया- यूक्रेन संघर्षात बॉम्ब हल्ल्यात झालेला विद्यार्थ्याचा मृत्यू दुर्दैवी आहे. “राज्य सरकारद्वारे बसवराज बोम्मई यांनी वैद्यकीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा यांच्या परिवारास 25 लाख रुपयांची आर्थिक मदत सुपुर्द केली असून यासोबत परिवाराच्या एका सदस्यास सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन यापूर्वीच दिलेले आहे . नवीन शेखरप्पाचे पार्थिव वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दावणगेरेच्या एस. एस. हॉस्पिटलला दान करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे.

( हेही वाचा :शिवतीर्थावर महाराजांच्या साक्षीने राज ठाकरेंनी दिली मनसैनिकांना ‘ही’ शपथ )

मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार

एएनआयशी बोलताना सीएम बोम्मई म्हणाले, “युक्रेनमध्ये गोळीबारात मारल्या गेलेल्या नवीन शेखरप्पा ग्यानगौदार यांचे पार्थिव परत आणल्या बदद्ल मी केंद्राचा आभारी आहे.  गोळीबारात नवीनचा मृत्यू झाला, हे दुर्दैवी असल्याचं यावेळी बसवराज बोम्मई म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.