नवाब मलिकांचा मुक्काम वाढला!

128

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात २३ फेब्रुवारीला ईडीने अटक केली होती. मात्र अद्याप मलिकांना दिलासा मिळालेला नसून त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यामुळेच मलिकांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम आता वाढणार आहे. परंतु नवाब मलिक यांच्या विनंतीनुसार त्यांना जेलमध्ये बेड, अंथरूण आणि खुर्ची देण्यास मुंबई सत्र न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.

( हेही वाचा : अखेर राणेंनी निवडला ‘हा’ पर्याय! )

मुंबई सत्र न्यायालयाने दिली परवानगी

नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मलिकांना न्यायालयाकडे बेड, खुर्चीची मागणी केली होती. यास मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी दिली असून नवाब मलिकांना तुरुंगात बेड आणि अथंरूणासोबत एक खुर्ची वापरता येणार आहे. तसेच मलिकांना हायपर टेन्शन आणि मधूमेह असल्यानं कमी मिठाचं घरचं जेवण देण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु यावर वैद्यकीय अहवाल आल्यावर निर्णय घेऊ असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणात नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारीला ईडीकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान,  ४ मार्च रोजी मलिक यांचा मुलगा अमीर मलिक याला एक आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीने कॉल केला होता. नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी त्याने मलिक यांच्या मुलाकडे १० बिटकॉईन म्हणजे ३ कोटी रुपयांची मागणी केली. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव न सांगता ही मागणी केली आहे. कोणीतरी आपली फसवणूक करतंय हे लक्षात येताच मलिक यांच्या मुलाने कुर्ला विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.