२८ फेब्रुवारी २०१९ पासून महाराष्ट्रावर महाविकास आघाडीच्या नावाचे संकट आले आहे. जेव्हापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले आहे, त्यांचा पायगुणच वाईट आहे. आमच्या राज्यावर विविध संकट येत आहेत. महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि आता कोरोना महामारीचा विषय आहे. हे सगळे संकट त्यांच्या पायगुणामुळे आले आहेत. त्यामुळे सोलापुरात तुळजाभवानीच्या पायाशी साकडे घातले आहे कि, देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जी राज्याची प्रगती झाली होती, त्यांना पुन्हा संधी दे जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेला संकटातून बाहेर काढू, असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले.
बाळासाहेबांची शिवसेना खरच राहिली का?
बाळासाहेबांचे कोणते स्वप्न शिवसेना पूर्ण करू शकली, हे सांगावे. आज बाळासाहेबांची शिवसेना खरच राहिली का? बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आणि त्यावेळीचे नेते आज कुठेच दिसत नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना बाजूला ठेवून पवारांची शिवसेना म्हणून काम करतांना दिसत आहे. देशात हिंदुत्वाचा प्रचारप्रसार आणि हिंदुत्वाच्या रक्षणाचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मार्गदर्शनाखाली होत आहे. देशातील जनतेने विश्वासाने भाजपकडे देशाची सूत्रे सोपवली आहेत, असेही आमदार राणे म्हणाले.
(हेही वाचा मुख्यमंत्री म्हणतात शिवजयंती तिथीनुसार, सरकार मात्र तारखेवरच ठाम!)
महाविकास आघाडी दाऊदची बी टीम!
एमआयएमचा प्रस्ताव महाविकास आघाडीला मिळाला आहे. त्यांचे आपसातच लग्न लागलेले आहे. यात भाजपचा काही संबंध नाही. त्यात भाजपचा काय विषय आहे? काय पुरावा आहे. आमच्या घरात सकाळची चहा घेऊन हे येतात का? भाजप काही कुणाची बी टीम नाही, उलट महाविकास आघाडीच दाऊदची बी टीम आहे, असा आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community