75 वर्षांनंतर मुस्लिमांच्या ‘या’ वास्तूवर झळकला तिरंगा !

123

कर्नाटकातील कोलार येथील घंटा घरावरचा इस्लामिक ध्वज अखेर हटवण्यात आला असून, त्याजागी तिरंगा फडकवण्यात आला आहे. 20 मार्च रोजी कोलार टॉवर भारतीय तिरंग्याच्या रंगाने रंगवण्यात आला होता. आता तिथे तिरंगा फडकवून कट्टरवाद्यांचा कट उधळून लावण्यात यश आले आहे.

परिसरात तणावाचे वातावरण 

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 75 वर्षांनंतर येथील घंटा घराला पांढऱ्या रंगात रंगवल्यानंतर, त्यावर तिरंगा काढण्यात आला. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण पाहता कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यासाठी रॅपिड एक्शन फोर्सही तैनात करण्यात आले होते. यासोबतच कोलार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डी. देवराजू हेही तेथे उपस्थित होते. 70 वर्षांपासून फडकत असलेला इस्लामी ध्वज हटवल्याने, कट्टरपंथी संतापले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असले, तरी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित

कोलार जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने येथे राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात काही मुस्लिमही सहभागी झाले होते.

खासदारांनी दिले आश्वासन 

यापूर्वी, कोलारचे भाजप खासदार मुनिस्वामी एस यांनी घंटा घरावर फडकणारा इस्लामी ध्वज हटवून, तेथे राष्ट्रध्वज फडकवण्याचे आश्वासन स्थानिक जनतेला दिले होते. खर तर हे सोपे काम नव्हते. तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. 20 मार्च रोजी खासदार मुनिस्वामी एस यांनी ट्विट केले की 74 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर एका विशिष्ट समुदायाच्या ध्वजाच्या जागी तिरंगा फडकवण्यात आला.

( हेही वाचा : कर थकबाकीचं भय? आता सरकार देणार ‘अभय’! )

व्यापा-याने घंटा घर बांधलं

हे घंटा घर 1930 मध्ये मुस्तफा साहेब नावाच्या व्यावसायिकाने बांधले होते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून, त्याचा रंग आणि ध्वज याबाबत वाद होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.