दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डी क्रूझ हीचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. गायत्रीच्या अकाली मृत्यूमुळे चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण पसरले आहे. ही अभिनेत्री केवळ २६ वर्षांची होती शुक्रवारी होळी साजरी करून ही अभिनेत्री आपल्या मित्रासोबत घरी जात असताना हैदराबादमधील गाचीबोवली परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला.
( हेही वाचा : अरेरे ! ‘जागतिक वन दिनी’च ‘या’ जंगलाला लागली भीषण आग )
भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये गायत्री उर्फ डॉली डी क्रूझचा मित्र राठोड याचाही मृत्यू झाला आहे. प्रवासादरम्यान अभिनेत्रीची कार रस्त्यावरील दुभाजकाला आदळून अनियंत्रित झाली आणि उलटली त्यामुळे हा अपघात झाला. अपघातादरम्यान या कारने आणखी एका महिलेला धडक दिली होती. या महिलेचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
जागीच मृत्यू
गायत्री उर्फ डॉली डी क्रूझ हीला, इन्स्टाग्राम पोस्ट आणि युट्युब चॅनेलच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली होती. तिला अलिकडेच वेब सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली होती तसेच तिने अनेक शॉर्ट फिल्ममध्येही काम केले होते. हा अपघात इतका भीषण होती की, तिचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या मित्राला रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु त्याचेही प्राण वाचू शकले नाहीत.
Join Our WhatsApp Community