पंजाब निवडणुकीत सर्व विरोधकांचा सुफडासाफ केल्यानंतर आम आदमी पार्टीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. निकालानंतर आपने मुंबई महापालिका निवडणूक टार्गेट केले आहे. त्याची तयारी सुरू केली असतानाच आता आप ने देशातील नऊ राज्ये लक्ष्य केले आहे.
राज्यांमध्ये प्रभारींची नावे जाहीर
आपने त्यासाठी देशातील इतर राज्यांमध्ये आपल्या संघटनेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: या वर्षी किंवा पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या राज्यांमध्ये असाम, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाब, राजस्थान आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. पक्षाने या राज्यांतील प्रभारी आणि संघटनेच्या लोकांची नावे जाहीर केली आहेत. पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 117 जागांपैकी 92 जागा जिंकत मोठे यश संपादन केले. या विजयानंतर आता पक्षाचा देशभरात विस्तार होण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला आहे. पक्षाने नऊ राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करताना प्रभारी आणि संघटनेतील लोकांची नावे जाहीर केली आहेत. या राज्यांमध्ये दक्षिण भारतातील राज्यांचाही समावेश होतो. पक्षाच्या वतीने नऊ राज्यांतील नवनियुक्त अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
(हेही वाचा मुख्यमंत्री म्हणतात शिवजयंती तिथीनुसार, सरकार मात्र तारखेवरच ठाम!)
Join Our WhatsApp Community