संपूर्ण राज्यासह विदर्भात सूर्य चांगलाच तळपत असल्याने होळी पूर्वीच राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. संत्री, केळी, आंब्यासह इतर पिकांवरही या वाढत्या तापमानाचा परिणाम होत आहे.
( हेही वाचा : पुण्यात ‘कशा’साठी लागतेय वाहनांची रांग!)
निसर्गातील वाढते तापमान संत्र, केळी, आंबा उत्पादकांची चिंता वाढवत आहे. नेहमी संत्र पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसतो मात्र यंदा अवकाळी पावसानंतर संत्री उन्हात होरपळत असल्याचे चित्र दिसून येते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे संत्र, केळी, आंबा उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. संबंधित कृषी विभागाने यावर उपाययोजना केल्यास फळ बागायतदारांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो.
बागायतदार चिंताग्रस्त
सध्याच्या वाढत्या तापमानाने नवीन कोवळ्या संत्रांची फळाची गळती होत आहे. केळ्यांच्या बागेतील घड काळवंडुन तुटुन पडत आहे. फळगळतीत अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या तापमानाने फळझाडातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने फळगळतीसह फळे तडकण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. संत्र्यांच्या फळबागेत औषधी फवारणी सुरू आहे, तर केळी बागेतील घडांचा उन्हापासून बचाव करण्याकरीता केळीपानांनी हे घड झाकण्याचे काम सुरु असल्याचे सुरू आहे. दरवर्षी साधारणतः घड एप्रिल महिन्यात झाकले जातात यंदा मात्र होळीपासूनच केळीघड झाकणीस सुरवात झाली.
Join Our WhatsApp Community